भारतात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात भारतात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. असे असताना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आपले निवडणुकीतील वचन पाळले आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे बिहारच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात हे वचन देण्यात आले होते. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयुचे संयुक्त सरकार आहे. बिहारमध्ये खासगी रुग्णालयांत देखील कोविड लस मोफत मिळणार आहे.
हे ही वाचा:
निवडणुकीच्या काळात कोविड-१९ वरील लस मोफत देण्याचे वचन देण्यात आले होते. त्यामुळे आता तोच निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कोविन-२च्या ऍपवर नोंदणी करावी लागणार आहे.
ही माहिती आरोग्य मंत्रालयाने आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीने घेतलेल्या एका कार्यशाळेत देण्यात आली. आयुष्मान भारत योजने अंतर्गत १०,००० हॉस्पिटल्सचा समावेश करून घेण्यात आला आहे, तर ६०० पेक्षा अधिक हॉस्पिटल्स सीजीएचएसच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत.
सरकारने दिलेल्या सुचनांनुसार कोणत्याही लाभार्थीसाठी एकावेळी एकच मार्गाने नाव नोंदणी करता येणार आहे. कोणतीही कोविड लसीच्या मात्रेची नोंदणी दुपारी ३ वाजता बंद होईल.
पात्र लाभार्थी कोविन २.० या ऍपवर मोबाईलवरून पात्र लाभार्थी नाव नोंदणी करू शकतात. एका मोबाईल क्रमांकावरून चार लाभार्थींची नोंदणी करू शकतात.