केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवीन घोषणा केली आहे. भविष्यात चक्क हायड्रोजनवर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रमात ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच गडकरींनी येत्या काळात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक आणणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनतर शुक्रवार, १७ जुन भविष्यात गाड्या, कारखाने, रेल्वे आणि विमाने हायड्रोजनवर चालणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे.
हे ही वाचा:
हिजाब बंदीमुळे अनेक मुलींनी सोडले शिक्षण
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न
पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!
लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी
नितीन गडकरी हे इथेनॉलला बढावा देत आहेत. ते म्हणाले की, अहमदनगरमध्ये पेट्रोलला हद्दपार करा, कार आणि बस इथेनॉलवर चालवा. यावेळी स्वतःचा ट्रॅक्टर बायो सीएनजीवर चालत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले आहे. ते म्हणाले, येत्या काळात साखरे ऐवजी अन्न पदार्थाकडे वळण्याची गरज असून, आजची स्थिती गहू स्वस्त तर ब्रेड महाग आणि टोमॅटो स्वस्त तर सॉस महाग अशी आहे. देशात साखर सरपल्स आहे त्यामुळे येत्या काळात साखरेऐवजी अन्य पदार्थाकडे वळण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी त्यांनी केले आहे.