नितीन गडकरींकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

नितीन गडकरींकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध महामार्गांच्या कामांसाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये काही टप्प्यांचे सशक्तीकरण आणि एक फ्लायओव्हर यांचा समावेश आहे.

नितीन गडकरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग ५४८ वर कात्रज जंक्शन येथे सहापदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी तब्बल ₹१६९.१५ कोटी मंजूर केले आहेत. वडगाव- कात्रज- कोंढवा- मंतरवाडी चौक- लोणी काळभोर- थेऊर फाटा- लोणीकंद रोड या महामार्गावर कात्रज जंक्शन येथे हा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

धर्म बदलून निकाह कर…नाहीतर तुझीही निकिता तोमर करू.

भितीदायक, महाराष्ट्राने ओलांडला ५०,००० रुग्णवाढीचा टप्पा

त्यानंतर पाटस- बारामती- इंदापूर- अकलूज-सांगोला- जत या राष्ट्रीय महामार्ग ९६५ चे सशक्तीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ₹१०.३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

या बरोबरच सिन्नर- घोटी- त्र्यंबकेश्वर- जव्हार- पालघर या राष्ट्रीय महामार्ग १६० वरील राष्ट्रीय महामार्ग ४८ ते पालघर या टप्प्याचे सशक्तीकरण करण्यासाठी ₹५.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण अंमलात आणल्यानंतर स्वतः इलेक्ट्रीक वाहनाचा वापर करायला सुरूवात केली हे. त्या बरोबरच त्यांच्या कार्यकाळात मंत्रालयाने ४० किमी प्रतिदिन रस्ते बांधणीचे लक्ष्य निर्धारित केले होते. त्यापैकी मंत्रायलयाने सध्या ३७ किमी प्रतिदिन इतका विक्रमी टप्पा गाठला आहे.

Exit mobile version