नितीन गडकरी संसदेत हायड्रोजन कार घेऊन पोहचले!

नितीन गडकरी संसदेत हायड्रोजन कार घेऊन पोहचले!

भारतातील रस्त्यांवर आता हायड्रोजन गाड्या लवकरच दिसणार आहेत. पर्यायी इंधानाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज संसदेमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीने आले होते. टोयोटा मिराई ही देशातील हायड्रोजनवर चालणारी पहिलीच गाडी आहे. भारतीय रस्त्यावर आणि भारतीय हवामानामध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या कशा प्रभावी ठरतील यासंदर्भातील चाचण्या सध्या सुरु असून त्याच अंतर्गत ही गाडी तयार करण्यात आली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही ग्रीन हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याचे प्रयोग करतोय. हा हायड्रोजन पाण्यापासून तयार केला जातो,” अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. “आता लवकरच आपल्या देशामध्ये ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन सुरु होईल. त्यामुळे इंधनाची आयात कमी होईल. शिवाय नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

हे ही वाचा:

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतकी वाढ

आता खैर नाही! नरसंहाराच्या काश्मिरी फाइल्स पुन्हा उघडणार

महाराष्ट्रात मास्क मुक्ती नाहीच!

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

मार्च महिन्याच्या सुरुवातील गडकरींनी हायड्रोजनवर आधारित फ्युएलच सेल इलेक्ट्रीक व्हेइकलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. झिरो एमिशन म्हणजेच शून्य प्रदुषण करणारी ही कार आहे. “टोयोटा ही जपानी कंपनी आहे. त्यांनी मला ही गाडी दिली असून ती ग्रीन हायड्रोजनवर चालते. मी स्वत: ती पर्यायी इंधन म्हणून पायलेट प्रोजेक्टच्या धर्तीवर वापरुन पाहणार आहे,” असे नितीन गडकरी म्हणाले.

Exit mobile version