नितीन गडकरी खंडणी धमकीप्रकरणाच्या मागे एक तरुणी

मंगळवारी सकाळी गडकरींना दोनदा फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. सध्या तरुणीची भूमिका संशयास्पद. स्थानिक पोलीसांकडून तरुणीची चौकशी सुरु.

नितीन गडकरी खंडणी धमकीप्रकरणाच्या मागे एक तरुणी

भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मंगळवारी आलेल्या १० कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी आली होती. गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात कॉल करण्यात आला होता. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणी मंगळुरू पोलिसांनी एका तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या तरुणीची भूमिका संशयास्पद आहे. स्थानिक पोलीस या तरुणीची चौकशी करत आहेत.

खंडणी प्रकरणाच्या पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक मंगळूरूला रवाना झाले आहे. या प्रकरणी नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी गडकरींना दोनदा फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मिळाली होती. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले होते. विशेष म्हणजे याआधी १४ जानेवारीला बेळगाव कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यावेळी जयेश पुजारी नावाच्या आरोपीने कार्यालयातील क्रमांकावर धमकी दिली होती. जयेश पुजारी हा तुरुंगात आहे.

मंगळवारीही पुन्हा त्याच जयेश पुजारी उर्फ ​​जयेश कंठा याच्या नावाने धमकी आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ज्या कार्यालयाला धमकी मिळाली ते कार्यालय नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ आहे. जानेवारी महिन्यात ही धमकी आल्यावर त्यांच्या कार्यालयाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची चर्चा होती. याशिवाय १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

हे ही वाचा:

राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

नितीन गडकरींना धमकी मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. या वर्षाच्या सुरुवातीला १४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन धमकीचे कॉल आले होते. पहिला धमकीचा फोन सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी, दुसरा फोन ११ वाजून ३५ मिनिटांनी आणि तिसरा फोन दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी आला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र एटीएसनेही या प्रकरणी तपास केला होता . बेळगाव कारागृहात असलेल्या जयेश पुजारी उर्फ ​​जयेश कंठा या कैद्याने धमकीचा फोन केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर कारागृहातील कैद्यापर्यंत मोबाईल कसा पोहोचला, असा प्रश्नही निर्माण झाला होता.

Exit mobile version