राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांची उत्तर देत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांना प्रवास करताना टोल भरावा लागत असल्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना नितीन गडकरी म्हणाले की शहरातील टोल माफ केला जाईल.
नितीन गडकरी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते. राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे स्थानिकांना टोल भरावा लागत असल्याचे सांगितले होते. यावेळी १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो, असं नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील टोल माफ केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा:
कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर
झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक
विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
“एक नवीन पद्धत सुरू करत असून ज्यामध्ये टोलमधून शहरी भाग वगळला जाईल, त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही. शहरातील लोकांकडून कोणताही अधिभार घेतला जाणार नाही. कारण १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी त्यांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. तसेच हा माझा नाही, तर मागील सरकारचा दोष आहे. पण यामध्ये दुरुस्ती करून जे योग्य आहे ते करू, असही नितीन गडकरी म्हणाले.