राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोलीनंतर आज ते परभणीत आहेत. राज्यपाल आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील प्रशासकीय इमारत भवनात येत आहेत. इथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करतील. त्यानंतर ते बांबू लागवड प्लॉटला भेट देणार आहेत. शिवाय शेतीविषयक अवजारांची पाहणीही ते करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.
बांबू लागवडीची पाहणी करताना राज्यपालांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. याशिवाय राज्यपालांनी विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणतात ‘सब का साथ सब का विकास’ और सबका विश्वास’, याप्रमाणे सगळ्यांनी एकत्रित राहा, असं राज्यपाल विद्यार्थ्यांना म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
हे ही वाचा:
राहुल गांधींचा ‘हा’ प्रयत्न ठरला फोल
बारा वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार?
जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा काल किरकोळ अपघात झाला. राज्यपाल कोश्यारी काल हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना अपघात झाला. या अपक्षातात ३ गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं. दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही.