लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान २६ एप्रिल रोजी पार पडणार असून प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे.त्यानुसार सगळेच नेते आपापला प्रचार जोरात करत आहेत.दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यवतमाळच्या सभेत भाषण करत असताना बेशुद्ध होऊन अचानक स्टेजवरच कोसळले. नितीन गडकरी स्टेजवर कोसळताच, स्टेजवर उपस्थित सुरक्षारक्षकांनी, लोकांनी बाजूला नेत पाणी पाजलं.यानंतर नितीन गडकरींनी पुन्हा भाषणात सुरुवात केली.
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे.महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेसाठी नितीन गडकरी यवतमाळच्या पुसदमध्ये आले होते.या सभेचे आयोजन पुसद येथील शिवाजी मैदानावर करण्यात आले होते.सभेला संबोधित करण्यासाठी नितीन गडकरी व्यासपीठावर येताच त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
हे ही वाचा:
बेंगळुरूमध्ये आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे, करोडोंचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त!
‘सरकार गेल्याने उबाठा भ्रमिष्ट आणि सैरभैर’
निर्णायक क्षणी राहुल गांधी बेपत्ता असतात
जिजाजी येत आहेत, जमिनीची कागदपत्रे लपवा
काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर नितीन गडकरींनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.नितीन गडकरी यांना काही मिनिटांसाठी स्टेजच्या मागे नेण्यात आले. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर गडकरींनी पुन्हा पुसद सभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता पूर्णपणे बरे असल्याची माहिती त्यांच्या नागपुरातील कार्यालयाने दिली आहे.तसेच विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे.विदर्भात सर्वत्र तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.