‘पाप झाकण्यासाठी कोरोनावर खापर फोडायचे, फ्रंटलाईन वर्कर्सने केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेने मिरवायचे’

‘पाप झाकण्यासाठी कोरोनावर खापर फोडायचे, फ्रंटलाईन वर्कर्सने केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेने मिरवायचे’

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

राज्यातील कोरोनाच्या सत्यस्थितीची जाणीव करून देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या पत्रामध्ये नितेश राणे यांनी फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत सरकार कसे हलगर्जीपण करत आहे यावरून सरकारला धारेवर धरले आहे.

कोरोना काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे मात्र, अशा कठीण काळात महाविकास आघाडीने आणि मुंबई पालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने आपल्या नियोजनाच्या अभावामुळे आणि अनाठायी निर्बंधांतून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणले आहे, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

ऑक्सिजन गळती, रुग्णालयांना लागणाऱ्या आगी, ऑक्सिजनची कमी यामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत कोविड वॉरियर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांनी त्यांच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा केली पण आघाडी सरकारने त्यांची नुसती फरफट करून ठेवली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या कर्मचाऱ्यांना सरकारने विम्याचे कवच दिलेले नाही. कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार असल्याच्या घोषणाच केवळ झाल्या आहेत, त्यांच्या कामाचं भांडवल करून केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न झाला, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

हे ही वाचा:

पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार

पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ

‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’

कोरोनाशी लढणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे अजूनही लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नाही. ही खेदाजनक आणि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या नाकर्तेपणाचे सगळे पाप झाकण्यासाठी कोरोनावर त्याच खापर फोडायचे आणि फ्रंटलाईन वर्कर्सने केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेने मिरवायचे असे स्वार्थी धोरण सत्ताधारी शिवसेना राबवत आहे, असा टोला नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सरकारला लगावला आहे.

Exit mobile version