30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण‘दिशा सालियनला घरी आणण्यासाठी वापरलेली काळी मर्सिडीज सचिन वाझेची?’

‘दिशा सालियनला घरी आणण्यासाठी वापरलेली काळी मर्सिडीज सचिन वाझेची?’

Google News Follow

Related

राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले असताना अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापिका दिशा सालीयान यांच्या मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन या आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी एकामागून एक ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा केला आहे.

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद राहिली आहे. आता त्यांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ तारखेच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहणारा रोहन राय सर्वांसमोर येऊन मोकळेपणाने का बोलत नाही?” असे ट्विट नितेश राणे यांनी मंगळवार, २२ फेब्रुवारी रोजी केले आहे.

“मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले. त्यानंतर मालवणी पोलिसांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यामुळे ८ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे, असे नितेश राणे यांनी लिहिले आहे. “मला आनंद आहे की, ते स्वतःसाठीच कबर खणत आहेत” असा टोला देखील नितेश राणेंनी लगावला आहे.

“दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या रंगाच्या मर्सिडीजने पार्टीमधून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीची काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सचिन वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आले होते. कनेक्शन?” असा खळबळजनक प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

“मालवणी पोलीस ठाण्याने निष्पक्ष तपास न केल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. बरोबर? आणि आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे? हे कितपत योग्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असे अनेक प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले आहे.

हे ही वाचा:

उल्हासनगर पालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी शासनाला फसवले

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

काश्मीर पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडणाऱ्या ‘काश्मीर फाईल्स’ चे ट्रेलर प्रदर्शित

नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा

दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नाही. तसंच त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. मात्र, तरीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी असून मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा