30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारण‘खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे’

‘खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे’

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून आज पोलीस चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नारायण राणे आणि नितेश राणे यांना देण्यात आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणाच्या तपासात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर दिशा सालियन हिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ठाकरे सरकारच्या या सुडाच्या राजकारणाला नितेश राणे यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे, न्याय मिलेगा’ विशेष म्हणजे आजच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज चौकशीसाठी दुपारी १ वाजता हजर राहावे लागणार आहे. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना कोर्टाने १० मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

हे ही वाचा:

काय आहे कारण? तालिबान पाकिस्तानवर नाराज मात्र भारताचे कौतुक

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी स्फोटात ५६ ठार

राज्यपालांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सुनावले

पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा

त्यापूर्वीच नितेश राणे यांनी सूचक ट्वीट केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता.

दिशाच्या पोस्टमार्टम अहवालामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याची नोंद अहवालामध्ये आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा