‘मुंबईच्या डोक्यावरून भ्रष्टाचाराची सत्ता आम्ही उतरवणार’

‘मुंबईच्या डोक्यावरून भ्रष्टाचाराची सत्ता आम्ही उतरवणार’

भारतीय जनता पार्टीची मुंबईतील कांदिवली भागात मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याची भव्य सभा पार पडली. भाजपाचे आमदार नितेश राणे व आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितित ही सभा झाली.

कांदिवली भागातील हनुमान नगर येथे ही पोलखोल सभा पार पडली. त्यावेळी नितेश राणे यांनी आमदार अतुल भातखळकरांनी आमंत्रित केल्याबाद्दल आभार मानत दुसरीकडे शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी पोलखोलची जबाबदारी आमच्यावर दिली आहे, त्याप्रमाणे आम्ही आमचे काम चोख करत असल्याचे राणे म्हणाले. तसेच राणे यांनी हनुमान नगरच्या जनतेला आवाहन केले आहे. ते म्हणाले, आपल्या विकासासाठी आमदार भातखळकर जो उमदेवार देतील त्यांना निवडून द्यावे.

गेल्या २५ वर्षांपासून अधिक शिवसेनेचे मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. हीच भ्रष्टाचाराची सत्ता मुंबईच्या डोक्यावरून उतरवण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण करत आहोत. या सभेसाठी हनुमान नगर मध्ये झालेली गर्दी पाहून राणे खुश झाले. त्यावरून त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून जेवढी मातोश्रीवर गर्दी नाही त्याच्यापेक्षा जास्त लोक आमच्या पोलखोल सभेला आले आहेत. शिवसेनेची आणि महापालिकेची वस्त्रहरण करण्याची जबाबदारी असल्याचे राणे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, महापालिकेचा भ्रष्टाचार आम्ही पद्धतशीरपणे बाहेर काढणार. मुंबईत २४ तास पाणी कधी मिळणारच नाही. मुंबईच्या रस्त्यावर खड्डे हे असणारच किंवा मिठी नदी ही कधी स्वच्छ होणारच नाही. अशी महापालिकेने मुंबईकरांना सवयच लावली आहे, ती सवय आता सोडण्याची वेळ आल्याचे राणे म्हणाले. निवडणुकीपुरते ही शिवसेना दर पाच वर्षांनी येते आणि मतदान घेऊन पुन्हा पालिकेत बसते. गेल्या तीस वर्षपासून मुंबईत हेच सुरु आहे, शिवसेना मतदानसाठी फक्त आपल्याकडे येते पुन्हा फिरकत नाही त्यांना अती आत्मविश्वास असल्याचे राणे म्हणाले.

हे ही वाचा:

राणांच्या समर्थनार्थ राणे

हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

कोरोना काळात आम्ही लोकांची मदत करत होतो. सर्वसामान्यांचे कोरोना काळात हाल झाले. मात्र हीच शिवसेना सरकाराच्या तिजोरीतून स्वतःची कोरोनाची बिल भागवली. जेव्हा आम्ही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले तेव्हा त्यांनी आमच्या नेत्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचे प्रयत्न केले. ठाकरे दर निवडणुकीला बदलत आहे. ठाकरेंचे हिंदुत्व सध्या गायब झालेले आहे. मात्र भाजपा हे फक्त पहिल्यापासूनच ओरिजनल आहे,असही राणे म्हणाले.

गेल्या तीस वर्षात शिवसेनेने फक्त आलेला पैसे कसा खायचा याचाच विचार केला आहे. कालच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर कार्यकर्त्यांना भेटीला नव्हते गेले. तर तिथली तिजोरी नीट आहे का, घराचं काम नीट झालं आहे का, हे बघायला ठाकरे गेले असल्याचे राणेंनी सांगितले.

Exit mobile version