अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची कोर्टात धाव

अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची कोर्टात धाव

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे हे सध्या अडचणीत असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे आता कोर्टात पोहचले असून त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

ऍड. संग्राम देसाई हे नितेश राणे यांच्यातर्फे युक्तिवाद करून त्यांची बाजू मांडणार आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. प्रदीप घरत आणि ऍड. भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला आले त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी या चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

राज्याचा आगामी अर्थसंकल्प नागपूरमधून

वसाहतवादी न्यायशास्त्र सोडा, मनू, कौटिल्य, बृहस्पतींचे न्यायशास्त्र अंगिकारा!

अकबर साजरा करायचा ख्रिसमस! मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे. वैभव नाईक यांनी ही मागणी करण्यासाठी सोमवारी २७ डिसेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. संतोष परब याच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

Exit mobile version