‘सुशांतसिंह प्रकरणात नितेश राणे लवकरच करणार हा गौप्यस्फोट

‘सुशांतसिंह प्रकरणात नितेश राणे लवकरच करणार हा गौप्यस्फोट

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रभाकर साईलचा व्हिडिओ समोर आला असून त्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २५ कोटी रुपयांची डील करून हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे देखील समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना दिसतात.

त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. सुशांतसिंह प्रकरणातील ऑडिओ रेकोर्डिंग लोकांसमोर आणण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

‘आर्यन खान प्रकरणात आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलची पार्श्वभूमी जाणून न घेता त्याचे म्हणणे खरे आहे, असे समजले जात असेल तर सुशांतसिंह प्रकरणातील गणेश हिवरकर यांच्यावर विश्वास का ठेवू नये? तो जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल असताना त्याला महाविकास आघाडीच्या युवा मंत्र्यानी धमकी दिली होती. यावेळी दिशा सालियान आणि सुशांतसिंह प्रकरणात त्या मंत्र्यांनी कबुली दिली होती. याबाबत गणेश हिवरकरने स्वतः माझ्यासमोर कबुली दिली होती. त्याची ऑडिओ रेकॉर्डींग देखील माझ्याकडे आहे. ते मी व्हायरल देखील करू शकतो’, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

लिव्हरपूलचा पंचतारांकित विजय

प्रभाकर साईलने त्याचे म्हणणे कोर्टात मांडावे

कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?

‘सर्वांसाठी नियम हे सारखे असायला हवे. तो मंत्री सुशांतसिंह राजपूतच्या सर्वात जवळचा होता. आता त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे म्हणू नका’, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला सध्या राज्यात चांगलाच राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. एनसीबीचे पंच प्रभाकर साईल याने व्हीडिओ जारी करत एनसीबीवर आरोप केले.

Exit mobile version