28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारण‘जरा दोन पेंग्विनचे लाड कमी करा आणि मुंबईचे रस्ते तरी दुरुस्त करा’

‘जरा दोन पेंग्विनचे लाड कमी करा आणि मुंबईचे रस्ते तरी दुरुस्त करा’

Google News Follow

Related

नितेश राणे यांनी दिला टोला

मुंबई आणि उपनगरांमधील रस्त्यांवर असलेले खड्डे हा एक चर्चेचा विषय बनला असून नागरिक या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी या खड्ड्यांपायी आपला जीवही गमावला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट काढले जातात मात्र त्यामुळे कंत्राटदार श्रीमंत होत आहेत आणि मुंबईकर खड्ड्यात पडत आहेत,’ असे नितेश राणे यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना सांगितले.

रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार हे ठरलेले आहेत, त्यांचे हक्काचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कधीही कारवाई केली जात नाही. ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या कंत्राटदारांना कामे दिली जातात. ‘जरा दोन पेंग्विनचे लाड कमी करा, पण निदान मुंबईचे रस्ते तरी दुरुस्त करा’, अशा शब्दात नितेश राणे यांनी महापौरांना सल्ला दिला आहे. तुमच्याच्याने होत नसेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून खड्डे बुजवतो, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणातील आठही आरोपींच्या गठड्या वळल्या!

ठाण्यात ‘व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम’ची नशा!

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला बदनाम करण्याचे आणि बॉलीवूडमधील कलाकारांना बदनाम करण्याचे मोठे षड्यंत्र एनसीबीला हाताशी धरून रचले असल्याचा आरोप केला होता याविषयी नितेश राणे म्हणाले की, ‘मुंबईत अमलीपदार्थांचा वापर वाढत चालला आहे आणि ही चिंतेची बाब आहे. मग यावर चिंता व्यक्त करायची, समर्थन करायचे की एनसीबीवर आरोप करायचे, हे समजत नाही का? ज्यांच्यावर आरोप करत आहात ते आपल्या समाजामधील पसरलेली घाण स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू द्यावे.’ असे नितेश राणे यांनी सांगितले.

‘एनसीबी, ईडी किंवा इतरही या संस्था कोण्या राजकीय पक्षाच्या नाहीत. त्या फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच लक्ष्य करत असतात असेही नाही. गैरप्रकार जिथे घडेल तिथे कारवाई केली जाते.’ असेही त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा