28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारण'उर्दू भवन मातोश्रीवर बांधा'

‘उर्दू भवन मातोश्रीवर बांधा’

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली

Google News Follow

Related

आग्रिपाडामध्ये उर्दू भवन उभारण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात येत असून, स्थानिकांनी आंदोलन केले आहे. आग्रीपाडा संघर्ष समितीला भाजपा आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उर्दू भवन बांधायचे असेल, तर मातोश्रीच्या जागेवर बांधा, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

आग्रीपाडामध्ये नितेश राणे गेले होते. त्यावेळी ते म्हणाले, आयटीआयसाठी भूखंड आरक्षित होता. या आरक्षित भूखंडावर नियोजित उर्दू शिक्षण केंद्र बांधण्यात येत आहे. आमच्या हक्काची जागा असताना अचानक उर्दु भवन का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. उर्दू भवन बांधायचे असेल तर मातोश्रीच्या जागेवर उर्दू भवन बांधा, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले, आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे आम्ही उर्दू भवन उभारू देणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयी योग्य तो निर्णय घेतील. हिंदुत्त्वांच्या मुद्द्यावर तडजोड नाही. उर्दू भवन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त

दरम्यान, ठाकरे सरकारच्या काळात उर्दू भाषा भवनची घोषणा करण्यात आली होती. यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. आग्रिपाडामध्ये हे भवन बांधण्याचे निश्चित झाले होते. परंतु, या उर्दु भवनाला स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. याला नितेश राणे यांनीही पाठिंबा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा