मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात फेरी मारताना सीसीटीव्ही का बंद होते?

मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात फेरी मारताना सीसीटीव्ही का बंद होते?

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री यांनी कुठल्याही कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. मात्र, शुक्रवारी १७ डिसेंबरच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अचानक विधान भवनात हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. विधान भवनातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांत जाऊन त्यांनी तिथल्या पूर्वतयारीची पाहणी केल्याची माहिती ‘न्युज १८ लोकमत’ने दिली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री विधान भवनात गेले असतील तर ही एक चांगलीच बातमी आहे. पण ते गेले होते तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे का बंद ठेवण्यात्ब आले होते, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. विधान सभेतील कर्मचाऱ्यांना ६ वाजता घरी जाण्यास का सांगितले होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. एवढं कसले गुपित आहे? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हे ही वाचा:

‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

ऑनलाईन क्लास दरम्यान मोबाईलचा स्फोट! १५ वर्षांचा मुलगा जखमी

‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’

‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’

काही दिवसांपूर्वी मुख्य्म्नात्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरही मुख्यमंत्री विश्रांतीवर होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अचानक विधान भवनात दाखल झाले. अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चालण्याचा सरावही केला, असे वृत्त आहे.

Exit mobile version