उद्धव ठाकरेंचा गट हा चायनीज शिवसेना आहे, असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही नितेश राणे यांनी टीकास्त्र डागलं आहे.
उद्धव ठाकरे जनपथवर साडी नेसून जायचे का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारत ते चायनीज शिवसेनेचे नेते असल्याची टीका केली आहे. त्यांची शिवसेना चायनीज, असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तसेच काँग्रेस नेते सध्या अमेरिकेत आहेत. राहुल गांधी यांच्या दौऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. खरी शिवसेना दिल्लीत जात नाही म्हणता मग तुमचे मालक जनपथवर किती वेळा गेले? दिल्लीला मातोश्रीची मम्मी आहे का? सीबीआय चौकशीवर बोलता मग श्रीधर पाटणकरबद्दल बोला, असं आव्हान नितेश राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातावर सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. यावरून नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ओडिशा अपघाताबद्दल सामनामध्ये आणि पत्रकार परिषदेत गरळ ओकण्याचा काम संजय राऊत यांनी केलं आहे. सामना वृत्तपत्र राज्य सरकारकडून ५० लाखांची जाहिराती घेतं. महापालिकेत सर्वात जास्त जाहिराती यांच्या पेपरला जातात. सरकारी तुकड्यावर जगणाऱ्यांनी हे बोलणं उचित नाही, अशी सडकून टीका नितेश राणे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार
बिहारमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला
‘महाभारत’ मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड
हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं
संजय राऊत नैतिकतेची भाषा करत आहेत. त्यांच्या मालकाच्या सरकारमध्ये लोकांचे जीव गेले तेव्हा पश्चताप झाला का? आमचे रेल्वे मंत्री तिथं रात्रभर होते. ते चांगलं काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या मालकाने काय केलं ते सांगा? यांचे मालक परदेशी फिरत आहेत. तेही कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून. दुसऱ्यांना नैतिकता शिकवता, मग तुमच्या मालकाने कधी राजीनामा दिला का? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित करत संजय राऊतांवर तोफ डागली.