“नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली”

“नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही त्यांना झेड प्लस सुरक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडून नाकारण्यात आल्याचा गौप्यस्फोट आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यावरून राज्याचे राजकारण तापले असताना, त्यातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट करत, उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझे वडिल नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक सुपाऱ्या देण्यात आल्या. तथाकथित शांत आणि सभ्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडून सुपारी देण्यात आली होती. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु,” असे ट्वीट करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यावेळीचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी काल केला.

Exit mobile version