“काश्मिरी पंडितांची चिंता करणाऱ्यांच्या राज्यातल्या हिंदूंचं काय?”

“काश्मिरी पंडितांची चिंता करणाऱ्यांच्या राज्यातल्या हिंदूंचं काय?”

काश्मिरी पंडितांविषयीची काळजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ४ जून रोजी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. यावरून भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची काळजी आहे. पण त्यांच्याच राज्यात राहत असणाऱ्या हिंदूंचं काय? रझा अकादमी आणि द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (PFI) सातत्याने हिंदूंना लक्ष्य केलं जात त्याचे काय? त्यांना कोण वाचवणार?” असे सणसणीत सवाल नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत. काश्मीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षित हातात आहे. त्याची चिंता तुम्ही करू नका, असा खोचक सल्ला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

हे ही वाचा:

…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा

‘घोडेबाजार’ शब्दावरून अपक्ष नाराज

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक

काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष असून काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version