मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, १४ मे रोजी घेतलेल्या सभेला भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे खरं बोलले होते की, शिवसैनिकांची अक्कल गुढघ्यात असते, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. दुसऱ्यांबद्दल टिंगल करताना स्वतःबद्दल ऐकायची ताकद ठेवायची, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक पाय बाबरीवर ठेवला असता तर बाबरी पडली असती अशी टीका केली होती त्यावर तुम्ही बाबरीजवळ असता तर तुम्ही हवेने उडाले असते, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली. तुम्ही वैयक्तिक पातळीवर टीका करता ते चालतं पण आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी
‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’
अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन
यशवंत जाधव कालच्या सभेत उपस्थित होते. ‘मातोश्री’च्या नावाने अफरातफर करणारे तिथेच असणं म्हणजे हे सर्व तुमच्या आशीर्वादाने सुरू आहे हे समोर आलं आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेचा अपमान तुम्ही केला आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.