‘संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे’

‘संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे’

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल भाजपवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरला आणि त्यानंतर सारवासारवही करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली. त्यावरूनच आता भाजप आमदार नितेश राणे संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे, असा टोला नितेश राणेंनी संजय राऊत यांना लगावला आहे. संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू मानू नये, असेही नितेश राणेंनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

रुपेरी पडद्यावर पुन्हा चालणार राजामौलीची जादू! ‘आर आर आर’ च्या ट्रेलरचा धुमाकूळ

‘महाविकास आघाडी सरकार आता अधिकृतरित्या वसुलीचे सरकार म्हणून मान्यताप्राप्त झालेले आहे’

विकी आणि कतरिना लग्न बंधनात

महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया

हिंमत असेल तर संजय राऊत यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावे, असे नितेश राणे यांनी सांगितले आहे. हिंमत असेल तर संजय राऊत यांनी पोलिसांच्या गराड्यातून बाहेर यावे, मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांना दाखवेल, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वादावर देखील नितेश राणे यांनी वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चालतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सर्वात असुरक्षित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था यांचे धिंडवडे निघाले आहेत यावर बोलायला हवे. मात्र, आशिष शेलारांनी जे कधी म्हटलेले नाही ते या लोकांना चालत नाही, असा घाणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

Exit mobile version