उद्धव ठाकरे यांची कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओवर नजर होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ही धक्कादायक माहिती दिली आहे. नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली होती त्यानंतर नितेश राणे यांनी हे आरोप केले आहेत.
नितीन देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एन. डी स्टुडिओ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना हवा होता. नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. ‘मातोश्री’ च्या जवळच्या व्यक्तीकडून नितीन देसाई यांना धमक्या दिल्या जात होत्या, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.
‘ठाकरे’ सिनेमाचे शूटिंग नितीन देसाईंच्या एन. डी स्टुडिओमध्ये करण्यात आले होते त्याचे पैसे दिलेत का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. सनी देओल यांना जो न्याय लावला तो नितीन देसाईंना का नाही? असा सवाल संजय राऊतांनी केंद्र सरकारला विचारला होता.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर मंत्री उदय सामंत म्हणाले होते की, “नितीन देसाई यांचे दुःख काय होते हे जर सांगायला तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही,” त्यांचा रोख कोणावर आहे असा सवाल उपस्थित झाला होता.
हे ही वाचा:
‘काँग्रेसकाळात अंतराळ संशोधनाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते’
पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक
ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणले!
तर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनीही धक्कादायक माहिती देत सांगितले की, “नितीन देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले तेव्हा या मराठी उद्योजकाला उद्धव ठाकरे यांच्या दरवाजावरून हाकलून देण्यात आले होते. मदत दिली नाही याची यादी सुद्धा आहे.”