संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घालावी

भाजपा आमदार नितेश राणे यांची आक्रमक भूमिका

संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घालावी

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडी घडत असून आमदार अपात्रते प्रकरणी कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत.

संजय राऊत आणि अंबादास दानवे हे सातत्याने वक्तव्य करत विधानसभा अध्यक्षांवर जाणीवपूर्वक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांवर विशेषधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी नितेश राणे यांनी विधीमंडळ सचिवांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या दोन्ही नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांनी टीका करत म्हटले आहे की, लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे. पत्रात नितेश राणे यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांची वक्तव्येही पत्रात लिहिली आहेत. “संविधान, कायदा आणि विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?”; “आम्ही करू ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाय राहणार नाही.”; “विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत.” अशी वक्तव्ये संजय राऊत यांनी केली होती. तर अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं की, “उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत.”

विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या पक्षांतरबंदी विषयी सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये  संजय राऊत आणि अंबादास दानवे या दोन्ही व्यक्तींचे  राजकीय हितसंबंध आहेत. अध्यक्षांविरोधात वरील वक्तव्ये करून विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्यात येत आहे. यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष सोमवार, २५ सप्टेंबर रोजी सुनावणी  घेणार आहेत. १४ सप्टेंबरला पहिली सुनावणी पार पडली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे.

Exit mobile version