ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील घराची रेकी करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर खळबळ उडाली होती. तर, घातपाताचा कट असून सामना कार्यालय आणि संजय राऊतांचे दिल्लीमधील निवास्थान येथेही रेकी झाल्याचा आरोप संजय राऊतांनीही केला होता. यानंतर संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
नितेश राणे म्हणाले की, “मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी रेकी करायची गरज नाही. खिचडीचोर नेमका कुठे राहतो आणि खिचडी कुठे डिलीव्हर करायची आहे हे पाहण्यासाठी ते लोक आले असावेत. संजय राजाराम राऊत यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे महत्त्व नाही. त्यांचे राजकीय महत्त्व जनतेने संपवले आहे. अशा मच्छरांना मारण्यासाठी गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विन आला आहे. याला फार गांभीर्याने घेऊ नये,” अशी खोचक शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा :
मुंबई महापालिकेसाठी माविआची साथ सोडत ठाकरेंचा स्वबळाचा नारा?
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर रवाना; आखाती देशाचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा का?
कल्याण प्रकरण; धीरज देशमुख यांच्यावर हल्ला करणारे सुमित जाधव, दर्शन बोराडे अटकेत
बांगलादेशात तीन हिंदू मंदिरांतील मूर्तींची विटंबना; अलाल उद्दीनला ठोकल्या बेड्या
संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी त्यांच्या ‘मैत्री’ बंगल्याची रेकी करण्यात आल्याचा आल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी सकाळी भांडुपमधील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याची दोन मोटरसायकलवरून अज्ञातांनी संशयास्पदरित्या तपासणी केली होती, असा व्हिडीओदेखील समोर आला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता.