ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काही नाही. सगळं दिल्लीतून ठरवलं जातं. महाराष्ट्र भाजपाची कमान ना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात. के. चंद्रशेखर राव यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून करायला लागले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत घाणाघाती टीका केली आहे.
“भ्रष्टाचारी ४२० संजय राऊत भाजपाबाबत ज्ञान पाजळत होते. उद्या दाऊद, विजय मल्ल्या पत्रकार परिषद घेतील. लोकांचे पैसे खाऊन हे ४२० बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. संजय राऊत हे राष्ट्रवादीची टीम आहेत,” असं नितेश राणे यांनी म्हणत टीकास्त्र डागलं आहे.
“सामना हे राष्ट्रवादीचं मुखपत्र आहे. राष्ट्रवादीचं हित सामनामधून होत आहे. संजय राऊत पगार उद्धव ठाकरेंकडून घेतात आणि राष्ट्रवादीची वाह वा करत असतात,” अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे. “राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे संजय राऊतांची जळाली आहे. सामना नेमकं कोणाच मुखपत्र आहे? राष्ट्रवादी की शिल्लक सेनेचं? हे आम्हाला समजलं पाहिजे,” असा खोचक सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.
हे ही वाचा:
थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही
समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ
मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!
…आणि जवळगेने विकृत तरुणाकडून कोयता खेचला, त्यामुळे तरुणी बचावली!
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या घेतलेल्या यादीत त्यांच्या मालकाच्या पक्षाचं नाव नव्हतं. तुमचे मालक संपत येत आहेत त्यामुळे स्वतःच बघून नंतर भाजपा नेत्यांवर बोलावं,” असे नितेश राणे म्हणाले आहेत. “संजय राऊत यांच्या पुढच्या आठवड्यानंतर सकाळच्या पत्रकार परिषदा बंद होतील. आता अंधारात कविता शायरी करावी लागेल,” असा टोलाही नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.