औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती. हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत संजय राऊत यांच्याकडे आहे का? असा सणसणीत सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी विचारला आहे. छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले, यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंब्य्राच्या आमदारांनी महाराष्ट्रात दंगली होण्याचे भाष्य केलं होतं. दोन तीन महिन्याअगोदर जितेंद्र आव्हाडांना कसं कळलं होतं? कोल्हापूरच्या नेत्याला कसं कळलं की दंगली होणार आहेत? असे सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या मतदरसंघात ४०० लोकांना धर्मांतर करताना पकडलं. यावर संजय राऊतांनी अग्रलेख लिहावा. अबू आझमी यांनी औरंगजेबाला मानतो असे वक्तव्य केलं. त्यावर संजय राऊत यांनी बोलावं, अशी टीका नितेश राणे यांनी केलं आहे.
‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ज्यांनी कर्ज दिल्याचा आरोप आहे त्या नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावर रेड पडली आहे. तुमच्या मालकाने ज्याच्याकडे खोके ठेवले आहेत, मातोश्रीचा दुसरा खरा मालक हा आहे. तो गायब आहे की त्याला लपवलं आहे याची माहिती सामनामधून द्यायला हवी,’ अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत
गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, ४०० जणांचे धर्मांतर?
लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले
दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन
श्रीधर पाटणकर देश सोडण्याच्या तयारीत आहेत. नंदकिशोर यांचे पैसे पाटणकर यांच्याकडे ठेवले आहेत. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचे पटत नाही. याचा पुन्हा एकदा पुरावा समोर आला आहे. संजय राऊत पण पगार भेटत नाही म्हणून जर एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.