“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज, ३१ जुलै रोजी सकाळी ईडीचे पथक चौकशीसाठी दाखल झालं आहे. मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. यावर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“आमच्या सगळ्यांची सकाळ खराब करणारे आज त्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटते. ईडी, सीबीआय, एनएआय या तपासयंत्रणा योग्य दिशेने चौकशी करतात. या महाशयांना वारंवार चौकशीसाठी बोलावलं गेलं पण स्वत: कोणीतरी मोठं आहे असं दाखवायच, आता जेव्हा ईडी चौकशी करत असेल तेव्हा त्यांची आत काय अवस्था होत असेल हे पाहण्यासाठी कॅमेरा लावायला हवा,” असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, ईडीकडून चौकशी सुरू असताना संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. “मी शिवसेना सोडणार नाही. खोटे पुरावे, खोटी कारवाई. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे. मी शिवसेनेसाठी लढत राहीन,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत ईडीचणीत

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर

दरम्यान, ईडीचे अधिकारी रविवारी पहाटे संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले आहेत. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते आणि त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती, यानंतर आता ईडीचे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे.

Exit mobile version