‘पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत’

‘पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत’

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाला हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरूनच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत, असा घाणाघात पडळकरांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाला निधी दिला नाही. अर्थमंत्री असून त्यांनी निधी दिला नाही. त्यांच्या मनात ओबीसींबद्दल आकस आहे. त्यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाले आहे. पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत, अशी टीका पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर केला आहे.

हे ही वाचा:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

‘वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणी शरम असल्यास आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’

पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द

झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस

राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा गोळा केला नाही. १८ महिन्यानंतर आयोगाची स्थापना केली. आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ओबीसींनी काय करायचे? कुठे जायचे? असे प्रश्न पडळकर यांनी विचारले आहेत.

Exit mobile version