हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घेरले असताना विधान भवनाच्या बाहेरही खडाजंगी चालू आहे. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात सध्या फोटोंवरून ट्विटरच्या माध्यमातून टोलेबाजी सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यटन आणि पर्यावरण विकास मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलेल्या नितेश राणे यांनी म्यॉव म्यॉव आवाज करत आदित्य ठाकरे यांना डिवचले होते.
त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी पैहचान कोन? असे ट्विट करत एक कॉकटेल फोटो ट्विट केला होता. आता नवाब मलिकांच्या टीकेला नितेश राणे यांनी देखील ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांनीही एक फोटो ट्विट करत त्याला कॅप्शन दिले आहे. ‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?’
ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..
ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/eoZzy7smAR— nitesh rane (@NiteshNRane) December 25, 2021
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे विधानभवनात जात असताना म्याव म्याव आवाज काढला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आपण योग्य व्यक्तीसाठी आवाज काढल्याचे त्यांनी म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली शिवसेना आणि आताची शिवसेना यात फरक आहे अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केली होते.