केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने राणे पिता पुत्रांना दिलासा दिला आहे. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री आणि आमदार या नात्याने या लोकशाहीने आम्हाला अन्याय होत असेल तर आवाज उठवण्याचा अधिकार देते, असे नितेश राणे म्हणाले. तरीही राज्य सरकारने आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता लोकशाहीच्या मंदिरामधूनच त्यांना योग्य उत्तर मिळालं आहे. आमची लढाई न्यायासाठी अशीच चालू राहणार असल्याचे नितेश राणे म्हणले.
हे ही वाचा:
होळीच्या निमित्ताने ठाकरे सरकारची नवी नियमावली
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच पारदर्शक तपास केला असता तर आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली नसती. आम्हाला मुंबई पोलिसांच्या कारभारावर विश्वास नाही कारण त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव आहे. पारदर्शक तपासासाठी माहिती आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना देणार. पुरावे कोणी दिले, काय पुरावे आहेत याची माहिती पोलिसांना हवी होती. कोणाच्यातरी दबावाखाली पोलीस काम करत होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयात मागणी करणार आहोत की, हा तपास सीबीआयने करावा. तपासाच्या दिवशी पण संबंधित अधिकाऱ्यांना पंधरा पंधरा मिनिटांनी फोन येत होते, असेही नितेश राणे म्हणाले.