‘राऊत आणि मलिक स्वतःच महाविकास आघाडीसाठी कबर खोदत आहेत’

‘राऊत आणि मलिक स्वतःच महाविकास आघाडीसाठी कबर खोदत आहेत’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना खोचक ट्विट करत टोला लगावला होता. नितेश राणे यांनी अनिल देशमुखांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर अनिल परबांना मेरी ख्रिसमस म्हणत नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल देशमुख हे पाच समन्सनंतर ईडीसमोर हजर झाले आहेत. मनात काही नव्हते तर इतका वेळ कशाला लावला, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. ज्या पत्राच्या आधारे अनिल देशमुखांना अटक झाली आहे त्यामध्ये अन्य लोकांचीही नावे आहेत. म्हणूनच अनिल परबांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे नाव लागोपाठ आहे म्हणूनच असा प्रश्न पडला आहे की, त्यांचे मेरी ख्रिसमस होणार का? आणि तो प्रश्न ट्विटच्या माध्यमातून विचारल्याचे त्यांनी सांगितले. पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले होते, असाही उल्लेख आहे. त्यामुळे पुढे उद्धव ठाकरेंनीही ईडीला यासंबंधी माहिती द्यायला हवी, असेही राणे म्हणाले.

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जातात की, ते यंत्रणांचा गैरवापर करतात यावर बोलताना नितेश राणे म्हणाले तुम्ही वसुली करायची, हप्ते गोळा करायचे, पचवायचे आणि नंतर यंत्रणांचे लक्ष गेल्यावर भाजपच्या नावाने बोंब मारायची.

हे ही वाचा:

भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य

जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी, कारण ते त्यातून महाविकास आघाडी सरकारसाठी कबर खोदत आहेत, असे नितेश राणे यांनी सांगितले. परमबीर सिंग यांनाही त्यांनीच महत्त्व दिले असून ते परदेशात आहेत असे म्हटले जाते मग त्यांची चौकशी करावी आणि माहिती घ्यावी.

सचिन वाझे हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा उचलून धरले म्हणून आज हे इतके मोठे प्रकरण समोर आले आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. नायजेरियन वस्तीतून ड्रग्जचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे नवाब मालिकांनी पोलिसांच्या माध्यमातून त्यांची वस्ती उद्ध्वस्त करावी. नाहीतर आता मीरा रोड पर्यंत आलेले हे लोक मुंबईत येऊन ड्रग्ज विकतील, असेही ते म्हणाले.

Exit mobile version