भाजप आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तेसाठी एकत्र येणारे महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष स्थानिक पातळीवर मात्र आपापसात भांडत असतात असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वतःच्या हिंमतीवर शिवसेनेला निवडून येण्याची ताकद नाही. जोडतोड करून सत्ता घेण्याचा शिवसेना प्रयत्न करते. एकटे निवडून येण्याची क्षमता नाही म्हणून भाजप विरुद्ध एकत्र येऊन ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे यातच भाजपचा विजय झालेला आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.
हे ही वाचा:
गेले दोन वर्ष सरकार अस्तित्वातच नाही
बड्या धेंडांकडून १३ लाख कोटी वसूल
ती म्हणते लाल किल्ला माझा, मला द्या!
आक्रमकता आमच्या रक्तात असल्यामुळे उद्या अधिवेशनात भाजपचे १०६ आमदार एकत्र महाराष्ट्राच्या हितासाठी नक्कीच लढताना दिसणार आहेत, असे नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्री जागेवरती येत नाहीत. कुठेही सरकार अस्तित्वातच दिसत नाही. या सरकारने मिस्टर इंडिया चे घड्याळ घातले आहे असे वाटतंय कारण मुख्यमंत्री जागेवर नाहीत आणि सरकार कुठेही दिसत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री घराबाहेर पडले तर ही माध्यमांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरते. नाना पटोलेनी मुख्यमंत्र्यांना हलवावे आणि तुम्ही बाहेर पडा, जनतेमध्ये दिसा असे सांगावे, असा खोचक सल्ला नितेश राणे यांनी नाना पटोलेंना दिला आहे. नाना पटोले हे पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहेत हे हास्यास्पद आहे. ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत ते घरी बसले होते, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.