ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आजचा दिवस हा बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, असा टोला नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री हे घराच्या बाहेर पडत नाहीत. असे मुख्यमंत्री राज्याला पहिल्यांदा लाभले आहेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. हिंदुत्वाशी बेईमानी, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी, स्वतःच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी, शेतकरी, कामगार सगळ्यांशी बेईमानी करून या ठाकरे सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा दिवस बेईमान दिवस म्हणून साजरा करावा असा घाणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘महाविकास आघाडी नव्हे महाविश्वासघातकी आघाडी’
‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’
… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक
राज्याची प्रतिमा रसातळाला गेली आहे आणि त्यासाठी ठाकरे सरकारच जबाबदार आहे. १९९३च्या बॉम्ब स्फोटातील जे प्रमुख आरोपी आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले नवाब मलिक यांच्याच मंत्रिमंडळात आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त चौकशीला गेले आहेत, सचिन वाझेंना यांनीच नेमले होते ते आज गजाआड आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.