अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन हे त्यांच्या काही वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल सेंटरमध्ये गेले असता त्यांनी काही काळ राष्ट्रपती पदाची सूत्रे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे कमला हॅरिस या सुमारे १ तास २५ मिनिटांसाठी अमेरिकेच्या राष्ट्रपती बनल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेरिकेत असे घडू शकते मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जर अमेरिकेचे राष्ट्रपती वैद्यकीय कारणांसाठी उपलब्ध नसताना ८५ मिनिटांसाठी जर सर्व सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात, तर महाराष्ट्रात हे का नाही घडू शकत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री हे संपूर्ण बरे होईपर्यंत राज्याची सूत्रे का सोपवली नाहीत. विश्वास नाही का कोणावर? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. ‘आम्ही नाही तर कोणीच नाही,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा आणि मणक्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहेत असे वृत्त आहे. मात्र, मुख्यमंत्री अजूनही रुग्णालयात असून येत्या दोन- तीन दिवसांत ते घरी परतणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version