26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरेंना मन की बात नाही तर धन की बात समजते

उद्धव ठाकरेंना मन की बात नाही तर धन की बात समजते

नितेश राणे यांची जोरदार टीका

Google News Follow

Related

बारसू दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेना – भाजपने रत्नागिरीमध्ये प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पंतप्रधान फक्त मन की बात करतात ती भाषा कोणालाच कळत नाही या उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलतांना केलेल्या विधानाचा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधानांनी केली मन कि बात लोकांना समजली म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले. पण उद्धव ठाकरे यांना मन की बात नाही तर धन की बात समजते असा जोरदार हल्ला आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला.

माविआ सरकारमध्ये असतानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बारसूमध्येच प्रकल्प होण्यास आपली मान्यता असल्याचे कळवले होते. आता उलटी भूमिका घेत उद्धव ठाकरे हे आपण प्रकल्प विरोधकांच्या बाजूने असल्याचा देखावा करण्यासाठी शनिवारीमध्ये बारसूमध्ये पोहचले. त्याला उत्तर देताना रत्नागिरीमध्ये प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढून प्रत्युत्तर देण्या आले.  पंतप्रधान मोदी मनकी बात करतात तर उद्धव ठाकरेंना केवळ धन की बात समजते असा आरोप करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे इथे पेटवापेटवी करण्यासाठी आलेले आहेत. पण ही पेटवा पेटवी करण्यापेक्षा आपल्या घरातील चूल पेटली पाहिजे यासाठी ते येथे आलेले आहेत असा जोरदार घणाघात केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधानांना बारसूमध्येच रिफायनरी झाली पाहिजे अशा समर्थनाचे पत्र पाठवले होते. आता विरोधी पक्षात असताना ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचे स्वप्न पडत आहे. हा त्यांचा विचार कोकणातील जनतेसाठी बदललेला नाही तर मातोश्रीवर खोके पोहचले पाहिजे यासाठी हा विरोध सुरु आहे. उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत अशी जोरदार टीका नीतेश राणे यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरेंनी त्यावेळी दिलेल्या समर्थनाच्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. हे खोके मातोश्रीवर पोहचले पाहिजेत म्हणून त्यांनी हा पत्र व्यवहार केला होतास आरोप करून नितेश राणे म्हणाले, बारसूत उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टर उतरु दिले नाही. त्यामुळे तिकडे सोलगावात उतरावे लागले. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंनी आल्याआल्या पेटवापेटवीचा प्रकार केलेला आहे. तेथूनच ते मुंबईला परतणार आहेत. उद्धव ठाकरे याठिकाणी हेलिकॉप्टरने आले ते कुठला व्यवसाय करतात? त्यांचे धंदे कोणते? याबाबत त्यांनी स्पष्ट करावे असा सवालही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना केला.

या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार मिळत आहे, व्यवसाय, शाळा, हॉस्पिटल उभे राहत आहेत असे सांगून नितेश राणे म्हणाले ,हे लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी येत आहेत. मात्र कोकणात रोजगार आला पाहिजे. हा मोर्चा एक झलक होता. या प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नारायण राणे सकारात्मक आहेत. विरोधातील लोकांनाही विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा