मंत्री उदय सामंतांचा भाऊ कोकणचा सचिन वाझे?

मंत्री उदय सामंतांचा भाऊ कोकणचा सचिन वाझे?

शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे कोकणातील सचिन वाझे तर नाहीत ना? असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. किरण सामंत हे आपल्या भावाच्या मंत्रिपदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करताना राणे यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

काय म्हणाले नितेश राणे
सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमारांमध्ये सुरु असलेली वसुली आणि जिल्हा प्रशासनावर टाकलेला दबाव या सगळ्याबद्दल आमच्याकडे माहिती येत असून त्याचे व्हिडीओग्राफी पुरावे आणि विविध कागदपत्र देखील आहेत असे राणे यांनी सांगितले. तर या सगळ्याचा आधारे महाराष्ट्र सरकार मध्ये जसा सचिन वाझे होता. ज्याला अटक झाली. तसेच कोकणाचा सचिन वाझे हा उदय सामंत यांचा मोठा भाऊच नाही ना? हे विचारण्याची आता वेळ आलेली आहे.

यावेळी राणे यांनी किरण सामंत यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशाचा वापर राजकारणामध्ये होतोय. लोकांच्या पक्षप्रवेशामध्ये होतोय. कॉन्ट्रॅक्टर लोकांचा संघटनेमध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे. भावाच्या मंत्री पदाचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होतोय. गरीब मच्छीमारांकडून, डंपरवाल्यांकडून हफ्ता वसुली केली जात आहे असे राणे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

अधिवेशनात आवाज उठवणार
महाराष्ट्र सरकारच्या आगामी अधिवेशनामध्ये संबंधित मंत्री आणि राज्य सरकारच्या समोर हे सगळे पुरावे आपण ठेवणार असल्याचे राणे यांनी सांगितले. तर अधिवेशनामध्ये या सर्व प्रकरणांवर आवाज उठवून सरकारला जाब विचारण्याचं काम आम्ही माध्यमातून करणार आहोत असे ते म्हणाले.

जी माहिती आमच्याकडे आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला जात असेल आणि त्याचे पुरावे आमच्याकडे असतील तर येणाऱ्या दिवसांमध्ये अँटी करप्शन ब्युरो असेल किंवा ईडी असेल, या तपास यंत्रणांना याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही राणे म्हणाले.

विद्यापीठांच्या सॉफ्टवेअर आणि मेंटेनन्स कंत्राटांसाठी दबाव?
बुधवारी ट्विट करत राणेंनी पुन्हा एकदा सामंत कुटुंबियांवर प्रहार केला आहे. ‘आपल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यभरातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आणि प्रतिनिधींनी फोन करून मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू दबाव आणत असल्याचे सांगतात’ असे राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विद्यापीठांच्या सॉफ्टवेअर आणि मेंटेनन्सच्या कंत्राटांसाठी हा दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या ट्विटमध्ये त्यांनी एका ‘वरूण’चाही उल्लेख केला आहे. त्यामुळे हा वरुण म्हणजे नक्की कोण? यावर चर्चा रंगताना दिसत आहे. आपण या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version