नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय

नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा रझा आकादमी आणि पीएफआय विरोधात तोफ डागली आहे. रझा आकादमी आणि पीएफआय या दहशतवादी संघटना असून समाजात विष पसरवत आहेत असा घणाघात राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत रझा आकादमी आणि पीएफआय यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी इंग्रजीतून तीन ट्विट करत या विषयाला वाचा फोडली आहे.

काय म्हणाले नितेश राणे
सध्या लाऊड स्पीकर हा खरा अडचणीचा मुद्दा नसून रझा आकादमी आणि पीएफआय सारख्या विष पसरवणाऱ्या दहशतवादी संघटना ही खरी अडचण आहे. या संघटनांच्या विरोधात एकत्रित लढा देणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी एकत्र येत या संघटनांवर बंदी येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतरच शांतता नांदेल.

हे ही वाचा:

राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

भोंगे हटविण्यासाठी एकत्र या, आता नाही तर कधीच नाही!

शिवसेनेला आठवण करून द्यायला राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट

रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून ती धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृतही नाही. याचा अर्थ त्या संघटनेला नोंदणी क्रमांकही नाही तरीदेखील राज्य सरकार या संघटनेला कामकाज करायची आणि आंदोलन करायची परवानगी देते. त्यांना निधी कुठून मिळतो हे आपल्याला कसे समजणार? त्यांचे सर्व कामकाज लवकरात लवकर थांबवले पाहिजे

खरा मुसलमान हा त्याच्या राज्याच्या किंवा देशाच्या विरोधात जाणार नाही. त्यांचे या मातीवर तितकेच प्रेम आहे जितके हिंदूंचे आणि इतरांचे आहे. पण रझा आकादमी आणि पीएफआय सारख्या संघटना या समुदायाचा राग आणि द्वेष पसरवण्यासाठी वापर करतात. अमरावती आणि नांदेड येथील दंगली हे याचे मोठे उदाहरण आहे. आता वेळ आली आहे त्यांना संपवण्याची

Exit mobile version