मराठीचे खरे मारेकरी…ही पेंग्विन सेना!

मराठीचे खरे मारेकरी…ही पेंग्विन सेना!

महाराष्ट्रातील सत्ताधारी असणारे शिवसेनेने कायमच मराठी माणसाचा मुद्दा पुढे करत राजकारण करायचा प्रयत्न केला. पण त्याच मुद्द्यावरून आता शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून सध्या भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.

सोमवार, २ ऑगस्ट रोजी राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर तोफ डागली आहे. ‘मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विन सेना’ असे म्हणत ‘माननीय बाळासाहेबांची शिवसेना आता आहे कुठे?’ असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

फ्रेंडशिप डे च्या अँबेसेडरवर चीनमध्ये का आहे बंदी?

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’

कोरेगाव भीमा खटल्यावरून न्यायमुर्ती शिंदेंना हटवण्याची मागणी! वाचा काय आहे कारण

काय म्हणाले राणे?
नितेश राणे यांनी सकाळीच एकूण चार ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे’ असे लिहिताना नितेश राणे यांनी टीकास्त्र डागले आहे. यामध्ये अब्दुल सत्तार उदय सामंत यांना दिलेले मंत्रीपद, प्रियंका चतुर्वेदींना दिलेली खासदारकी, राहुल कनाल यांना दिलेली शिर्डी संस्थेची जबाबदारी यावर राणे यांनी भाष्य केले आहे. तर ‘डाके, रावते, रामदास कदम, शिवतारे, राजन साळवी, सुनील शिंदे यांच्यासारखे जुने शिवसैनिक दिसणार नाहीत’ असे नितेश राणे यांनी लिहिले आहे.

मराठी माणसाची संघटना म्हणे. पण मग बेस्टच्या जागा कनाकिया, बीएमसी कॉन्ट्रॅक्ट दिनो, इथे कुठे मराठी माणूस का दिसत नाही? असाही हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे.

तर नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? असा सवालही राणे यांनी विचारला आहे. आधी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार केला मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विन सेनाच असा घणाघात राणेंनी केला आहे.

Exit mobile version