आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करताना शेवाळे म्हणाले होते की, त्याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला एयूच्या नावाने ४४ कॉल आले होते. यावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी तर ‘A फॉर आफताब A फॉर आदित्य’ असं म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले, काल राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सानियानच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. हेच राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. एकेकाळी ते उद्धव ठाकरेंचे लाडके होते. त्यामुळे त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील एक खासदार बाहेर येऊन सांगतो आहे, की रिया चक्रवर्तीला एयूच्या नावाने ४४ कॉल झाले आणि त्यांच्यात एयू म्हणजे आदित्य ठाकरे आहे. त्यामुळे याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

आम्ही जे आतापर्यंत बोलत होतो, त्यापेक्षा महत्वाचे राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे. आजही दिशा सानियानच्या मृत्यूची केस मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी. ८ आणि ९ जूनच्या रात्री काय झालं? कशामुळे सुशांतसिंगची हत्या करण्यात आली. रिया चक्रवर्तीची या प्रकरणात भूमिका काय आहे? या प्रकणात तपास अधिकारी दोनदा का बदलले गेले? या सर्व गोष्टींची चौकशी होणं गरजेचं असल्याचे राणे म्हणाले.

दिशा सालियन आणि सुशांतसिंगच्या मृत्यूच्या विषयी नेहमी आदित्य ठाकरे यांचं नाव का पुढे येते? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. एकाच माणसाचं सातत्याने नाव घेतले जाते. आजपर्यंत माझ्यासह जे कोणी या विषयावर बोलले, त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले आहे. सुशांतसिंगच्या चाहत्यांनीदेखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा:

…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले

ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात

अपमान करून घेण्याची हौस…

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

A फॉर आफताब आणि A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकसमान झालं आहे, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

Exit mobile version