मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीतेचे पठण करण्यास मान्यता देण्याची मागणी करणारे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे. आपल्या शाळेत भगवद्गीतेचे नाही, तर मग फतवा- ए- आलमगिरीचे पठण व्हायला हवे का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. यावर पालिकेने आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेत भाजपाच्या योगिता कोळी यांनी महापालिका शाळेत भगवद्गीता पठण व्हावं, असा प्रस्ताव महापौरांसमोर मांडला होता. या प्रस्तावाला समाजवादी पक्षाने विरोध केला. हिंदूराष्ट्र असलेल्या आपल्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला असा विरोध होणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आपल्या शाळांमध्ये भगवद्गीतेचं पठण करायचं नाही, मग औरंगजेबाचे फतवा-ए-आलमगिरीचं पठण करायचे आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भगवद्गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका पार पडेल, असे नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’
‘भुजबळांची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो म्हणून एफआयआर
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात
“हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की, भगवद्गीतेचे पठण महापालिका शाळांमध्ये होण्यासाठी योगिता कोळी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.