30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारण'...यालाच म्हणतात सत्तेचा माज!'

‘…यालाच म्हणतात सत्तेचा माज!’

Google News Follow

Related

नितेश राणेंनी नवघरेंच्या कृत्यावर व्यक्त केली नाराजी

राजकारणी तारतम्य सोडून वागतात तेव्हा त्यांचे हसेच होते. कालच वसमत हिंगोलीत घडलेला प्रकार हा निंदनीय आणि चीड आणणारा होता. हिंगोलीमधील वसमत शहरातील बहुप्रतिक्षीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला हार घालताना अतिशय निदंनीय प्रकार घडला. यासंदर्भात भाजप आमदार नितेश राणे यांनी नवघरे यांच्या या कृत्याचा निषेध करत घणाघाती टीका केली आहे. त्यांनी ‘याला सत्तेचा माज म्हणतात!! हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत’ असे ट्विट करत राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाल्यानंतर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी या पुतळ्याच्या अश्वावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण केला. हा व्हिडीओ लगेचच समाज माध्यमावर लगेच पसरला आणि जनमानसातून उग्र प्रतिक्रीया उमटू लागल्या. समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, आमदार नवघरे यांच्यावर लगेच सर्वच स्तरातून टीका सुरु झालेली आहे.

 

हे ही वाचा:

ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाला घेतले ताब्यात

अभिनेत्री नोरा फतेह आली ईडी कार्यालयात; जॅकलिनलाही समन्स

 

आमदाराच्या या कृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कृत्याचा निषेध होतच आहे. राजकीय क्षेत्रामधूनही घडलेल्या निंदनीय घटनेवर टीकेची झोड उठवली जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी नवघरे यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. त्यानी सडेतोड राणे स्टाईलमध्ये ‘याला सत्तेचा माज म्हणतात!! असे ट्विट केलेले आहे. घडलेल्या या निंदनीय घटनेनंतर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार असा सवालच सदाभाऊंनी थेट विचारला आहे. ‘महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’ पणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‘राजू नवघरे’ यांच्या या कृत्यानंतर मग आता बाबर सेना काय करणार. राष्ट्रवादीच्या आमदाराला चपलेने मारणार की भवन वर बोलून फुलाचा हार घालणार? असा प्रश्न विचारत या घटनेचा निषेध केलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा