पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंवर टीका होत आहेत. आदित्य ठाकरेंवर भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. पाप करून मांजर अयोध्येला गेले असल्याची खोचक टीका राणे यांनी केली आहे.
बुधवार, १५ जून रोजी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे अनेक नेते अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरून नितेश राणे यांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, शंभर पाप करून, मांजर म्याव म्याव करायला अयोध्येला गेली, अशी टीका त्यांनी केली आहे.
सौ पाप करके बिल्ली meow meow करने अयोध्या चली !!😅😅😅
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2022
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोध सुरू झाला आहे. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे वर्णन पूर्णत: राजकीय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते. त्यांच्यावर दहशतवादी कायद्यान्वये कारवाई केली जाते. आता अशा परिस्थितीत अयोध्येत येऊन आदित्य ठाकरेंना काय संदेश द्यायचा आहे.
हे ही वाचा:
१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी
आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये
संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार
वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका
दरम्यान, यापूर्वी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दोरा १० जून रोजी होणार होता. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या दोऱ्याची तारीख बदलून १५जून करण्यात आली.