29 C
Mumbai
Saturday, March 29, 2025
घरराजकारण‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून विरोधी पक्षावर टीका केली आहे. आता यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘मालकाच्या घरीच “गांजाचा बादशाह” असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांजावर इतके प्रेम बर नाही,’ अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्वीट करत केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे ही वाचा:

सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू

नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य

युवराज सिंगला का झाली अटक?

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राणेंचे अटकनाट्य घडले होते. त्यानंतर चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर आले होते. तिथेही दोघांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले होते. भाजप आमदार नितेश राणे यांनीही सरकारवर टीकेची तोफ डागली होती.

मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण, शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेली पत्रकार परिषद यानंतर विरोधी पक्षानेदेखील सत्ताधारी पक्षांवर टीकेची तोफ डागली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा