यावर्षी जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सत्ताधारी पक्ष शिवसेनेवर जनतेच्या हिताच्या दृष्टीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पूर येतो त्यावरही नितेश राणेंनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र पाठवले आहे.
मुंबईत ३८६ फ्लडींग पाईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलिकडे आपण काय केले आहे? का यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? @mybmc @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/vlo5v93ykI
— nitesh rane (@NiteshNRane) May 16, 2022
नितेश राणेंनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, अशीच ओळख शिवसेनेने मुंबईची करून ठेवली आहे. ही मुंबईची ओळख शिवसेना बदलणार आहे की नाही, असा सवाल राणेंनी केला आहे. दरवर्षी मुंबईकरांचा पावसामुळे जीव जातो. काही ठेकेदारांच्या मर्जीसाठी रंगरंगोटी आणि दिखाऊ कामापलीकडे मुंबई पालिका काहीच करत नसल्याचा आरोप राणेंनी केला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर
होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!
तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही
पुढे ते म्हणाले, यावर्षी मुंबईत जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. याची खबरदारी म्हणून मुंबई महापालिका काही पाऊले उचलणार आहे की नाही? असा सवाल राणेंनी केला आहे. मुंबईमध्ये जवळपास ३८६ धोक्याची ठिकाणे असून, तिथे खबरदारी म्हणून पालिका फक्त पाण्याचे पंप देते. यावर्षीच्या पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार काही धोरण आखणार आहे का? काही जनजागृती सरकार करणार आहे का? असे सवाल राणेंनी ठाकरे सरकारला केले आहे. यासह नितेश राणेंनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले आहेत.