नितेश राणे यांनी पोलिसांना विचारला सवाल
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. नारायण राणे यांचे पुत्र व आमदार नितेश राणे यांना रत्नागिरीत जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादांत आता नवी भर पडली आहे.
नितेश राणे यांनी व्हीडिओद्वारे पोलिसांच्या या कृतीवर आक्षेप नोंदविला. ते म्हणाले की, रत्नागिरीच्या दिशेने मी जात होतो पण मला आणि अन्य सामान्य नागरिकांना रत्नागिरीला जाण्यापासून पोलिसांनी परावृत्त केले. पोलिसांकडे लोकांना रोखण्यासंदर्भात कोणताही ठोस आदेश नाही. मी आदेश मागितल्यावर त्यांनी तो देण्यास नकार दिला. माझ्यासोबत इथे अनेक असे लोक आहेत, ज्यांना चिपळूणला जायचे आहे, कुणाला रत्नागिरीला जायचे आहे. पण त्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे. पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही नोटीस नाही, कोणताही कागद ते दाखवत नाहीत. उलट मला मारण्याची भाषा पोलिस करत आहेत. याची दखल सर्वांनी घेणे गरजेचे आहे. या पद्धतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे, म्हणून मी या व्हीडिओच्या माध्यमातून हे वास्तव मांडले.
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
हे ही वाचा:
राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?
सायकल ट्रॅकचा घाट कुणाच्या फायद्यासाठी?
ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ
शिवडी बीडीडी चाळीतील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
नारायण राणे यांनी रायगडमध्ये जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर भाषेत टीका केली. त्यावरून महाराष्ट्रातील वातावरण पेटले आहे. शिवसेनेने या संधी लाभ उठविण्याचे ठरवत नारायण राणे यांच्या घरावर आक्रमण केले, भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड केली, त्यांच्याविरोधात बॅनरबाजी केली.