भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकार वादग्रस्त कट्टरतावादी संघटना रजाक आदमी तिच्यावर बंदी का घालत नाही असा सवाल राणे यांनी केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राणे विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात गेले दोन दिवस तलवारींचे साखे सापडले आहेत यावरून राज्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. गुरुवार, २८ एप्रिल रोजी धुळ्यात पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर शुक्रवार, २९ एप्रिल रोजी धुळेनंतर नांदेडमध्ये पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला. महाराष्ट्रात या तलवारी काँग्रेसशासित राजस्थान या राज्यातुन आल्या आहेत.
हे ही वाचा:
जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’
पतियाळात ‘खलिस्तान मुर्दाबाद’चे नारे देणाऱ्या शिवसेना नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी
यावरूनच भाजपा आमदार नितेश राणे आक्रमक झालेले दिसत आहेत महाराष्ट्र पोलिसांना धुळे आणि नांदेड येथे मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा सापडला आहे कुणाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी याच जिल्ह्यांमध्ये दंगली झाल्या होत्या यामध्ये रजा अकादमी चा हात होता महाविकास आघाडी सरकार फार उशीर होण्याआधी रजा अकादमी या संघटनेवर बंदी का घालत नाहीत कशाची वाट बघितली जात आहे असा सवाल राणे यांनी केला आहे.