राहुल गांधी सावरकर कधीच होऊ शकत नाहीत…

भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा संसदेत घणाघात

राहुल गांधी सावरकर कधीच होऊ शकत नाहीत…

संसदेत दोन दिवस अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी गौरव गोगोई यांनी या अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले पण नंतर भाजपाचे झारखंडमधील नेते निशिकांत दुबे यांनी चर्चेला तोंड फोडले. त्यांनी काँग्रेस, ‘इंडिया’, राहुल गांधी अशा सगळ्यांवरच तोंडसुख घेतले.

 

राहुल गांधी या प्रस्तावावर बोलणार होते पण ते संसदेत आलेच नाहीत. त्यावर निशिकांत दुबे यांनी टीका करताना म्हटले की, आम्हाला वाटले की राहुल गांधी बोलतील पण ते तयार नव्हते बहुतेक. उशिरा उठले असतील. गौरव गोगोई यावर चांगले बोलले.

 

गोगोई बोलत होते तुम्ही मणिपूरला गेला नसाल. पण मी मणिपूरमध्ये भोगले आहे. १९९० मध्ये माझ्या काकांवर हल्ला झाला. डीआयजी होते एन. के. तिवारी त्यांचे नाव. त्यांच्यासारखे अधिकारी नसते तर काश्मीर वाचवता आला नसता. पण जेव्हा ते मणिपूरमध्ये गेले तेव्हा काँग्रेस सरकारने त्याना अटक केली होती.

 

झारखंड, गोड्डाचे खासदार असलेल्या निशिकांत दुबे यांनी सांगितले की, मिझोराममध्ये काँग्रेसला सात टक्के मते मिळाली होती. पण लालडेंगा यांच्यासह सरकार बनवले.

 

राहुल गांधी गेलेच कुठे होते?

 

दुबे म्हणाले की, राहुल गांधी पुन्हा संसदेत आले म्हणता पण ते गेले होते कुठे. आम्ही बजेटमध्ये आलो मार्च एप्रिलमध्ये तेव्हा ते होते संसदेत. पावसाळी अधिवेशनात होते मग ते गेले होते कुठे. सर्वोच्च न्यायालयाने अजून निकाल दिलेला नाही. केवळ राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

राहुल गांधींवर जोरदार टीका करताना निशिकांत म्हणाले की, मी गांधी आहे, सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणत असतात. पण ते सावरकर होऊ शकत नाहीत. २८ वर्षे त्यांनी तुरुंगामध्ये घालविली आहेत. तुम्ही हे कधीही करू शकत नाही.

दुबे म्हणाले की, INDIA बद्दल सगळे आज बोलत आहेत.  पण इथे जे बसलेत त्यातील अनेकांना त्याचा फुलफॉर्म सांगता येणार नाही. पंतप्रधान म्हणतात, हा अविश्वास प्रस्ताव नाही. विरोधकांमधील विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. मी त्याबद्दल विचार केला तेव्हा कळले की कोण कोण आपल्यासोबत आहे, हे तपासण्यासाठीच या सगळ्यांनी हा प्रस्ताव आणला आहे.

 

डीएमके हा पहिला पक्ष. करुणानिधींचे मोठे योगदान आहे. १९७६मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काँग्रेसने करुणानिधींच्या सरकारला बरखास्त केले. पुढे इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये हाच डीएमके पक्ष गेला. राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा वर्मा आणि जैन कमिशन बनवले गेले. लिट्टेला पाठिंबा होता डीएमकेचा असे जैन कमिशनने म्हटले होते. तरीही म्हटले जाते की, टू जी घोटाळ्याचे आरोप आम्ही तुमच्यावर केले?

 

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ही दुसरी पार्टी. सिंगूरचे आंदोलन झाले. भाजपानेही त्यात टीएमसीला साथ दिली. राजनाथ ही ममता बॅनर्जींसोबत आंदोलनात सहभागी झाले. पण तुमच्यावर शारदा, नारदाच्या केसेस आम्ही केल्या नाहीत काँग्रेसने केल्या. तुमचा विरोध काँग्रेसला असला पाहिजे. लालू प्रसाद यांचा आरजेडी पक्ष त्यांना आम्ही तुरुंगात पाठवलं नाही. सगळे एकदुसऱ्यांशी भांडत आहेत पण नाव ठेवले इंडिया.

निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, चौथा पक्ष मुलायम सिंह यांचा समाजावादी पक्ष. देशप्रेमाची भावना त्यांच्याकडे होती. विश्वनाथ चतुर्वेदी कार्यकर्ते काँग्रेसचे. लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई झाली. याच सभागृहात मुलायम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. पण तुम्ही काय केले. आम्ही मात्र त्यांच्यावरील सीबीआयच्या केसेसे बंद केल्या.

 

 

सुप्रिया सुळेंवर टीका

 

 

निशिकांत दुबे यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघात केला. ८० मध्ये शरद पवार यांच्या सरकारला कुणी बरखास्त केले. काँग्रेसने केले. ज्या आधारावर शरद पवारांनी वेगळी एनसीपी केली ती आम्ही बनवायला सांगितली नाही. पवारांना ग्राहक संरक्षण मंत्रालय सोडावे लागले. व्हाइट पेपर कुणी आणला. छगन भुजबळ यांच्यावर खटला काँग्रेसनेच घातला. आम्ही कुठे काय केले. आमच्याशी लढाई कसली आहे.

फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष हा पुढचा पक्ष. १९५३मध्ये शेख अब्दुल्ला यांना १९७५पर्यंत तुरुंगात टाकले काँग्रेसने.

 

बेटे को सेट करना है…

 

 

सोनिया गांधींचा मी सन्मान करतो. अविश्वास प्रस्ताव आला. पार्टीची दोन मनस्थिती आहे. बेटे को सेट करना है दामाद को भेट करना है.

पंतप्रधान गरीबाचे पुत्र आहेत. मी ज्या भागातून येतो. रात्री कुणी आजारी पजला तर गंगा ओलांडण्यासाठी पूल नाही. पण स्वातंत्र्यानंतर तिथे पूल होतोय. झारखंडमध्ये सर्वाधिक खनिजे मिळतात, तरीही पण पंतप्रधानांमुळे बोट आली गंगेत. रेल्वे लोकांनी बघितली नव्हती. ७५ वर्षए गोड्डातील लोकांनी रेल्वे बघितली नव्हती.  

Exit mobile version