राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असताना ठाकरे सरकारचे मंत्री मात्र राजकारण करताना दिसत आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची स्थिती फार वाईट आहे. अशा परिस्थिती, याच विदारक परिस्थितीविषयी बोलताना माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“नवाब मलिक सारखे ठाकरे सरकार मधले भिकार मंत्री रोज उठून फालतू राजकारण करत आहेत पण ग्रामीण भागांमध्ये ही भयावह परिस्थिती रोज बिकट होत चालली आहे. या मंत्र्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, रोज उठून गरज नसलेल्या गोष्टी मीडियासमोर बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करतायेत.” असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे.
नवाब मलिक सारखे ठाकरे सरकार मधले भिकार मंत्री रोज उठून फालतू राजकारण करत आहेत पण ग्रामीण भागांमध्ये ही भयावह परिस्थिती रोज बिकट होत चालली आहे. या मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजे, रोज उठून गरज नसलेल्या गोष्टी मीडियासमोर बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करतायेत. pic.twitter.com/982bFS5emO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 20, 2021
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असे म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरु असताना फडणवीसांचे तिथे जाणे त्यांना अडचणीचे ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हे ही वाचा:
शिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
सहा महिन्यात भारतात बनणार लिथियम-आयन बॅटरी
रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या मालकाची मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अशाप्रकारे ताब्यात घेणे हा कृतघ्नपणा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली होती.