माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर एकच चर्चा रंगली.मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती.त्यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली.
निलेश राणे यांच्या भेटीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.रवींद्र चव्हाण म्हणाले, “निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अनन्या होऊ नये ही सर्वांची भावना आहे.”
हे ही वाचा:
युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात असं त्याचं म्हणणं होतं. याबाबत आम्ही चर्चा केली. निलेश राणे यांनी रागावून निर्णय घेतला होता. आता मी स्वतः या विषयात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊ.
आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
निलेश राणेंचा निवृत्तीचा निर्णय मागे
भाजप नेते निलेश राणे यांनी बुधवारी एक ट्विट करत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. आज रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे.